‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

म. गांधी आणि डॉ. आंबेडकर हयात असते, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर त्यांचेही एकमत झाले असते, त्यांनी या निकालाचे स्वागतच केले असते...

‘अधिक मागे राहिलेल्यांना मागेच ठेवण्याचा (थोडे सक्षम झालेल्यांचा) हा डाव आहे का? आणि समजा, अजून ती वेळ आलेली नाही, तर अधिक पिछड्यांना पुढे कसे आणायचे? पाऊणशे वर्षे पुरेशी नसतील, तर आणखी किती वर्षे उपवर्गीकरण नको, की ते कधीच नको?’ या सर्व चर्चेत ‘आरक्षणाचे धोरण व मूळ उद्दिष्ट काय आणि कशासाठी’ याकडे दुर्लक्ष होते आहे. शिक्षण व सरकारी नोकऱ्या यांमध्ये मागास घटकांचे पुरेसे प्रतिनिधित्व झाले पाहिजे, हे आहे मूळ उद्दिष्ट.......

चंद्राबाबू व नितीशबाबू आणि मोदी व शहा यांच्यातील संबंध पाहता- वैचारिक विरोधक व मनोवृत्तीमध्ये प्रचंड फरक, मात्र राजकीय आघाडी एकत्र, असे हे प्रकरण आहे

सरळ विचार केला तर मोदी-शहा यांना बदलावे लागेल, समर्थक व विरोधक यांचा सामना करताना लवचीकता दाखवावी लागेल. मात्र ते असे करतील का? त्यांची मूळ प्रवृत्ती त्यांना असे करू देईल का? ते असे लवचीक होणार असतील, तर भाजपचे समर्थक त्यांना साथ देतील आणि विरोधक बोथट होतील. अर्थातच, भाजप व संघपरिवारातील लहान-मोठ्या संघटना उपद्रवमूल्य कमी करतील का? त्यावरच नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या तिसऱ्या राजवटीचे भवितव्य अवलंबून असेल........

म. गांधींच्या दीड वर्षाच्या सहवासाने अरुण खूपच बदलले, आयुष्यभर पुरेल इतका ‘प्रेमाचा वारसा’ व ‘रागाचे वरदान’, अशी शिदोरी त्यांना मिळाली. त्या बळावर पुढील ७५ वर्षे ते कार्यरत राहिले

‘कष्टाविना संपत्ती, विवेकहीन सुखोपभोग, चारित्र्यविना शिक्षण, नीतिमत्तारहित व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागरहित भक्ती, तत्त्वहीन राजकारण’, ही बापूंनी जगभर लोकप्रिय केलेली सात सामाजिक पातके. त्याला Rights without Responsibility, जबाबदारीविना अधिकार हे आठवे पातक अरुण गांधी यांनी जोडले. ही पातके कमी होत जावीत, यासाठी काम करणारे अरुण गांधी स्वतःला ‘शांती पेरणारा शेतकरी’ असे संबोधत असत.......

आजवरची उपराष्ट्रपतीपदाची परंपरा आणि कायदेमंत्रीपदाची परंपरा लक्षात घेता, जगदीप धनखड आणि किरिन रिजिजू या दोघांमुळे त्या दोन्ही पदांचे अवमूल्यन कधी नव्हे, इतके झाले आहे!

या देशाचा कायदामंत्री आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही संविधानिक पदे अत्यंत प्रतिष्ठेची मानली जातात. त्यांच्या उक्ती-कृतीतून विद्वत्ता, विवेक आणि सौहार्द यांचे दर्शन घडत राहावे, अशी अपेक्षा असते. उपराष्ट्रपती व कायदामंत्री असलेल्या दोन वकिलांकडे, विरोधी पक्षांना व न्यायसंस्थेला अडचणीत आणण्याचे काम सोपवले गेले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना असे नेते लाभावेत, हे किती वाईट!.......

या मुलाखतीतून विषयांची विविधता आणि आशयाची गहनता स्पष्ट होईल आणि या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कलाविषयक जाणिवा, सामाजिक भान आणि वैचारिक निष्ठा, यांत खूप जास्त एकात्मता असल्याचेही लक्षात येईल

व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वत:च्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेपआणि आजच्या समाजजीवनावर भाष्य, ही चतु:सूत्री समोर ठेवून या मुलाखती घेतलेल्या असल्यामुळे त्या वाचनीय आणि संग्राह्य झालेल्या आहेत. ‘आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने...’ हा अभंग साहित्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या मुलाखतखंडाला लागू होतो. आणि ‘जे का रंजले गांजले...’ हा अभंग समाजकार्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखत खंडाला लागू होतो.......

सुनील देशमुख यांनी मागील २८ वर्षांत जी भूमिका निभावली, ती पाहता, त्यांना महाराष्ट्राच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रांतील ‘कॅटलिस्ट’ संबोधने योग्य ठरेल

सुनील देशमुख यांनी दोन कोटी रुपये ही प्रारंभीची गुंतवणूक केली, ते केवळ भागभांडवल होते आणि नंतर २८ वर्षे त्यांनी स्वतःचा वेळ, ऊर्जा, बुद्धी यांची जी गुंतवणूक केली, तिचे मूल्य शेकडो कोटी रुपयांमध्ये मोजावे लागेल. अन्यथा दोन कोटी रुपये देणारे पूर्वीही कमी नव्हते आणि आजही कमी नाहीत. पण असे दोन कोटी रुपये देऊन असे पुरस्कार या पद्धतीने व या प्रकारे देऊन इतके परिणामकारक काम करता येणार नाही.......

आगरकरांच्या आयुष्यातील पूर्वार्ध माहीत नसल्याने त्यांचा उत्तरार्ध समजून घेण्यामध्ये अडथळे येतात. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चांगली चरित्रात्मक कादंबरी आली तर त्याचे स्वागत करायला हरकत नाही

कुमारवयातील गोपाळची एका वानराशी त्याची झटापट होते. गोपाळच्या या कर्तबगारीचे त्याच्या मित्रांना खूप कौतुक वाटते. अर्थात टिळक आणि आगरकर यांची बाजू घेऊन वादविवाद करणारांना त्याचा एक चांगला फायदा होऊ शकेल. शालेय वयातील टिळकांच्या संदर्भात शेंगा आणि टरफलं हा प्रसंग रंगवून सांगितला जातो. तसाच आगरकरांच्या चाहत्यांनाही कुमारवयातील गोपाळचा हा प्रसंग सांगता येईल. म्हणजे ‘टिळकांच्या शेंगा’ आणि ‘आगरकरांच्या चिंचा’.......

‘पंचायतराज’ सक्षम नसण्याचे पाचवे कारण... लोकशाही बळकट करण्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व संघटना यांचा गाव पातळीवर असलेला नाममात्र प्रभाव

महाराष्ट्रातील किती ग्रामपंचायतींमध्ये खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणावेत अशा पक्षांची वा त्यांच्याशी संबंधित गटांची सत्ता आहे? गावपातळीवर प्रबोधनात्मक, संघर्षात्मक व रचनात्मक काम झालेले नसेल तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांचा प्रभाव पडणार तो कसा? येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील चौदा हजार ग्रामपंचायतींमध्ये किती सरपंच पुरोगामी पक्ष-संस्था-संघटना यांच्याशी नाते सांगणारे आहेत, हे पाहायला हवे.......

ठोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आणि देशाची सामाजिक चौकटच बदलू इच्छिणाऱ्या संघाला सारासार विचार करू शकणारा कोणताही नागरिक विरोधच करेल!

कालच्या विजयादशमीला शिवसेना ५० वर्षांची झाली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ९१ वर्षांचा झाला. या दोहोंविषयी सर्वसामान्य म्हणजे ‘जिओ और जिने दो’ म्हणणाऱ्या वाचकांना निश्चित व निर्णयात्मतक मत बनवणं नेहमीच अवघड वाटत आलं आहे. त्यांना आपलं मत बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल असा, अत्यंत साध्या व संयत शैलीत लिहिलेला एक लेख ११ वर्षांपूर्वीच्या विजयादशमीला प्रसिद्ध झाला होता. त्याचं आजच्या युवा वाचकांसाठी पुनर्मुद्रण.......